अलिबाग : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली होती. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असं म्हणत अंतरिम जामीन नाकारला होता. तर, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करत दिलासा दिला होता.
आता, याप्रकरणी पुन्हा एकदा अर्णबच्या अडचणीत वाढ होऊ शकतात. काल (दि. ४ डिसेंबर) रोजी रायगड पोलिसांनी अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तर, आज अलिबाग कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह अन्य 2 जणांविरोधात गंभीर आरोप आहेत.
काय आहे हे प्रकरण?
अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता. महिन्याभरापूर्वी याप्रकरणी मुंबईतील अर्णबच्या निवासस्थानी मुंबई व रायगड पोलीस चौकशीसाठी घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
सुरुवातीला त्यांना अलिबागच्या नगरपालिका शाळेत ठेवण्यात आले. अर्णबने जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, अलिबाग सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याने उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणत उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली. अर्णबने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर जामीन नाकारल्याचे निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याला जामीन मंजूर करून तूर्तास दिलासा दिला होता. दुसरीकडं, सरकार सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप करत आक्रमक पवित्र घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

