Share

चिंताजनक : दिल्लीत कोरोनाचा प्रकोप, मागील चोवीस तासात आढळले रेकोर्डब्रेक रुग्ण

Published On: 

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्गाचा प्रकोप सुरूच आहे. मागील चोवीस तासात या शहरात तब्बल ८ हजार ५९३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय चोवीस तासात ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील मृतांचाही हा सर्वाधिक आकडा आहे.

बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्याने संक्रमीत होत असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून ७ हजार २६४ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याची माहिती दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. चोवीस तासात ६४ हजार १२१ चाचण्या करण्यात आल्या असून १३.४० टक्के संक्रमीत सापडले आहेत. संक्रमितांची राष्ट्रीय सरासरी ४.२ टक्के इतकी आहे. या तुलनेत दिल्लीतील संक्रमितांचे प्रमाण तिप्पटीने जास्त आहे.

दिल्लीत आतापर्यंत कोरोना संसर्गातून ४ लाख ५९ हजार ९७५ लोक बरे झाले आहेत. याशिवाय ७ हजार २२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्युदर घटून १.५७ टक्क्यांवर आला आहे. दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या ४२ हजार ६२९ इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!