नवी दिल्ली : IPL 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीरने रोहित च्या नेतृत्वाचे जाहीरपणे कौतुक केले आहे.
‘जर आता भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलं नाही तर हे भारताचं दुर्देव असेल,’ असं मत गंभीर यानं व्यक्त केलं. रोहित शर्माला आता कर्णधार करण्याची वेळ आली असल्याचं मत त्यानं व्यक्त केलंजर कोणताही खेळाडू पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? एक कर्णधार तेवढाच चांगला असतो जेवढा त्याचा संघ असतो यात कोणतंही दुमत नाही. परंतु एका कर्णधाराचं कौशल्य ओळखण्याचं कोणतं प्रमाण असतं? कोणत्याही कर्णधाराचं कौशल्य ओळखण्याचं प्रमाण एकच हवं,’ असं गंभीर म्हणाला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही सोशल मीडियावर रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी तो म्हणाला, रोहित शर्माकडे आता निश्चितपणे हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपवायला हवे. टी-20 लढत कशा प्रकारे जिंकता येईल हे त्याला चांगलेच माहीत आहे. यामुळे विराट कोहलीलाही एक खेळाडू म्हणून आपल्या कामगिरीत सुधारणा आणता येईल.
दरम्यान,आयपीएल स्पर्धेचे पाचवे विजेतेपद मिळवल्यानंतर माझे कौतुक होत असले तरीही हा माझ्या एकट्याचा नव्हे तर, सांघिक खेळाचाच विजय आहे, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. त्याने संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच संघमालक यांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी परताव्यात झाली १० टक्क्यांची वाढ’ – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, भाजपा करणार चुन भाकर आंदोलन
- तैमूर लवकरच होणार मोठा भाऊ, सैफिनाच्या घरी येतोय छोटा पाहुणा!
- मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करणार – जयंत पाटील
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’


