मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यातच आता अर्जुन तेंडुलकर या लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याने अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल.
अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख रुपये इतकी असणार आहे. १८ फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल.
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो २०१८ मध्ये भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला.
२१ वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंबाजोगाईच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची निवड
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय


