🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. मोदी हे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वीही त्यांनी अंबाजोगाई नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भूषविले आहे.
नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी यांची निवड उपनगराध्यक्ष म्हणून होणार हे निश्चित झाले होते. अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 5 ) नगरपरीषद सभागृहात सर्व सदस्यांची बैठक झाली.
या बैठकीत काँग्रेसच्या वतीने दोन फॉर्म दाखल करण्यात आले होते. बैठकीत २३ नगरसेवकांनी राजकिशोर मोदी यांची उपनगराध्यक्ष निवडीसाठी पाठींबा दिला. त्यातील नगरसेवक मनोज लखेरा यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस पक्षाचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
