जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishvash Nagre Patil) यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील (Rupali Nagre Patil)आणि विश्वास नांगरे पाटलांचे सासरे पद्माकर हरीभाऊ मुळे (Padmakar Mule) यांनी जालना साखर कारखाना बेनामी पद्धतीने गुडूप केला. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
किरीट सोमय्या माहिती देताना म्हणाले, जालना साखर कारखाना शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी बेनामी पद्धतीने गुडूप केला. हजारो शेतकऱ्यांचाची आणि कामगारांची फसवणूक केली. खोतकर आणि त्यांचे पार्टनर मुळे आणि रुपाली विश्वास नागरे पाटील आत्ता तिथे बिल्डिंग आणि मार्केट/मॉल बांधणार आहे. या घोटाळाला मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
जालना साखर कारखाना शिवसेना नेता अर्जुन खोतकर नी बेनामी पद्धतीने गुडूप केला. हजारो शेतकऱ्यांचाची आणि कामगारांची फसवणूक केली
खोतकर आणि त्यांचे पार्टनर मुळ्ये आणि सौ रुपाली विश्वास नागरे पाटील. आत्ता तिथे बिल्डिंग आणि मार्केट/मॉल बांधणार
ह्या घोटाळाला मुंबई पोलिसनी क्लीन चिट दिली pic.twitter.com/MOlGwtFLYb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 21, 2021
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, जालना साखर कारखान्याचे सध्याचे मालक कोण आहेत? खोतकर आणि अजीत सिड्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीत भागधारक कोण आहेत? सध्या जालना सहकारी साखर कारखान्याचे मालक अर्जुन खोतकर, पद्माकर हरीभाऊ मुळे आणि दुसरे नाव आहे रुपाली विश्वास नांगरे पाटील म्हणजे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याला क्लिन चिट देण्यासाठी मदत केल्याचाही आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी…- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांची घोषणा; आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मोठी मदत


