मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउन जाहीर केले आहे. यादरम्यान गुरुवारी ६ मे रोजी अरिजीत सिंगच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने गुरुवारी ६ मे रोजी सकाळी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये स्वस्तिकाने बॉलिवुडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगची आई कोलकाता येथील ढाकुरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असुन त्यांना A-रक्ताची गरज आहे असे सांगितले. हे रक्त पुरुषाचेच हवे असे स्वस्तिकाने म्हणले आहे.
https://twitter.com/swastika24/status/1390163898750308353
आरिजीत सिंगच्या आईला रक्त मिळाले का नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अरिजीत सिंगने बॉलिवुडला अनेक सुपरहिट गाण्यांना त्याचा आवाज दिला आहे. तर सान्या मल्होत्राच्या आगामी चित्रपटात अरिजीत सिंग हा संगीतकार म्हणुन पदार्पन करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णांना योग्य उपचार मिळालेच नाही तर कोरोना कसा रोखणार? खा. दानवेंचा सवाल
- ‘सुर नवा’च्या सेटवर आ. सरदेसाईने गोधंळ घालत चित्रीकरण बंद करण्याची केली मागणी
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत’
- ‘कोरोना लढ्यासाठी विदेशातून आलेल्या निधीचे काय झाले?’, राहुल गांधींचा मोदींना सवाल
- पुण्यात लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय होणार सुरू


