औरंगाबाद : राज्य सरकारच्या वतीने स्थलांतरीत करण्यात आलेले क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद शहरातच करण्यात यावे, अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे. त्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. या आंदोलनातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदारांनी औरंगाबाद पोलीसांच्या दुटप्पी भूमीकेचा समाचार घेतला.
राज्यात कोरोना निर्बंध लागू असताना नव्याने केंद्रात मंत्री झालेले डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत आहेत. औरंगाबाद पोलीसांनी एमआयएमवर गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखवली तशी या नेत्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो होते, पक्ष वाढीसाठी नव्हे, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद पोलीसांनी आमच्यावर अशा प्रकारे कितीही गुन्हे दाखल केले तरी एमआयएमचे कार्यकर्ते आणि मी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारच असल्याचेही खासदारांनी स्पष्ट केले. पोलीसांच्या या दुटप्पी भूमीकेवरही त्यांनी सडकून टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींचा मुबलक पुरवठा करण्यासाठी सीरमने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
