नवी दिल्ली : देशाचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविरोधात डासना देवी मंदिराचे पुजारी नरसिंहानंद सरस्वती यांनी ‘कलाम जिहादी होते’ अस धक्कादायक विधान केलं आहे.
नरसिंहानंद सरस्वती यांनी अलीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना कलाम जिहादी होते, त्यांनी अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली असं म्हटलं आहे. तसेच देशभरामध्ये सन्माननीय कुटुंबांमधील कोणतेही मुस्लीम हे कधीच भारत समर्थक असू शकत नाहीत असं देखील मत व्यक्त केलं. त्यांच्या या धक्कादायक विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नरसिंहानंद यांनी अब्दुल कलाम यांनी डीआरडीओ प्रमुख असतानाच पाकिस्तानला अणुबॉम्ब निर्मितीसंदर्भातील माहिती दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच कलाम यांनी मुस्लिमांसाठी एक विशेष विभाग देखील तयार केल्याचाही दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रपती भवनामध्ये अब्दुल कलाम यांनी एक विशेष विभाग तयार केला होता जिथे कोणतीही मुस्लीम व्यक्ती आपली तक्रार दाखल करू शकत होता असं नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे.
नरसिंहानंद सरस्वती हे दिल्ली-एनसीआरमधील मुख्य शहरांपैकी असणाऱ्या गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे पुजारी आहेत.काही दिवसांपूर्वी मंदिरामध्ये पाणी प्यायल्याने एका मुस्लीम तरुणाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याच मंदिरात नरसिंहानंद हे पुजारी आहेत.
कलाम यांना देशाचे मिसाइल मॅन म्हणून ओळखलं जायचं. कलाम हे आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या पुस्तकांमधून आणि भाषणांच्या व्हिडीओंमधून अनेकांना आजही प्रेरणा देतात. देशाचे ११ वे राष्ट्रपती ठरलेल्या कलाम यांना २७ जुलै २०१५ मध्ये शिलाँग येथे भाषण देतानाच हृदयविकाराचा झटका आला. कलाम हे त्यांच्या साधेपणासाठी आणि प्रेरणादायी भाषणांसाठी आजही ओळखले जातात. मात्र आता पुजाऱ्यांनी केलेल्या कलामांबाबतच्या वादग्रस्त विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- उमरगा पालिकेत पावणेदोन कोटींचा घोटाळा करणारा मास्टरमाईंड अटकेत
- पराभवानंतर इंग्लंडला आणखी एक मोठा झटका ; कर्णधार मॉर्गन आणि ‘या’ फलंदाजाच्या खेळण्यावर शंका
- जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार का दिला ?
- बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन
- ‘स्त्रीचा अपमान करतो त्याचा विनाश निश्चित ; इतिहास साक्ष आहे रावणाचं…’

