जालना : दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे, त्यामुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढतच आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता रक्त बॅगेची गरजही वाढत चालली आहे. अशातच जिल्ह्याच्या जनकल्याण रक्तपेढीकडे मोठ्या प्रमाणात रक्त बॅगेची मागणी होत आहे. मात्र, रक्त अपुरे पडत असल्याचे चित्र समोर येत आहे आणि केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच साठा सध्या उपलब्ध आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता काळाची गरज लक्षात घेत रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढीचे अध्यक्ष रमेशभाई पटेल यांनी केले आहे.
कोरोना काळात रक्त बॅगेचा मोठ्या प्रमाणात तुडवडा निर्माण झाला आहे. या वेळी रक्तपेढीच्या वतीने रक्तदानाचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत ८८ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ४ महिन्यांत ३ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. मागच्यावर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा शिबिराची गरज निर्माण झाली आहे. रक्तपेढीकडून सध्या सरासरी ६५ रुग्णालयांत जवळपास ५० रक्तपिशव्या दर दिवसाला दिल्या जातात. तर महिन्याला ११० ते १३० बॅग या थॅलेसेमिया रुग्णांना मोफत पुरवल्या जातात.
सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाहीये. औद्योगिक वसाहतीतही कामगारांचे प्रमाण हे अर्ध्यावर आलेले आहे. अशा स्थितीत रक्त संकलन करण्यास अडचणी येत आहेत. रक्तदान करणाऱ्यांनी जनकल्याण रक्तपेढी येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत येऊन रक्तदान करावे असे आवाहन जनसंपर्क अधिकारी वंदना शेळके यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रश्मी शुक्ला यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती ?
- कर्णधार कोहलीचा विश्वविक्रम; ठरला जगातील पहिलाच खेळाडू
- नाणेफेक हरल्यावरही कर्णधार कोहली होता आनंदी, सांगितले ‘हे’ कारण
- सहानुभूती मिळवू पाहणाऱ्या इंग्लडच्या वॉनला आकाश चोप्राचे सडेतोड उत्तर
- वन डे मालिकेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिकची भावुक पोस्ट ; म्हणाला, ‘वडिलांनीच…’

