Share

उमरगा पालिकेत पावणेदोन कोटींचा घोटाळा करणारा मास्टरमाईंड अटकेत

Published On: 

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर पालिकेत दीड वर्षांअगोदर पावणेदोन कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यावर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण व्यवस्थेची झोप उडाली होती. शेवटी या प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. तब्बल दीड वर्षांपासून फरार आरोपीस इनोव्हा कारसह अटक करण्यात आली आहे.

उमरगा नगर पालिकेतील लेखाधिकारी, कंत्राटी कर्मचारी व इतरांनी मिळून मुख्याधिकारी यांच्या नावे बनावट खाते काढून व खोटे शिक्के तयार करून पावणेदोन कोटी रुपयाचा घोटाळा केला होता. याप्रकरणी पहिल्यांदा ४९ लाखाच्या अपहारप्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर अपहाराची रक्कम पावणेदोन कोटीपर्यंत वाढली होती.या घोटाळ्याप्रकरणी पालिकेचे तत्कालिन लेखापाल विनायक वडमारे, कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे व सुरज चव्हाण, सचिन काळे, पवन बाबुराव मात्रे – सोमवंशी व नंतरच्या तपासात नंदकुमार झांबरे अशा सहा जणांची नावे समोर आली होती.

दरम्यान अपहार झालेल्या पावणेदोन कोटीपैकी ३३ लाख ९८ हजार पालिकेत जमा झाले आहेत. आतापर्यत या प्रकरणातील ६ पैकी ४ आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. या प्रकरणी फरार असलेला पवन म्हात्रे यास इनोव्हा कारसह सोलापूर येथून मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!