Share

Bacchu Kadu | बच्चू कडू अडचणीत! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Published On: 

मुबंई : बच्चू कडू यांच्या विरोधात राजकीय आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आणि आमदार तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. एवढेच नाही तर त्यांचा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे.

बच्चू कडू अडचणीतः

राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी दाखल केलेले निषेदाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात बच्चू कडू यांना हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. एवढेच नाही तर बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी देखील सुणवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरणः

30 मार्च 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाचं भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचा तीव्र पडसाद उमटला होता. मंत्रालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत आंदोलन केलं होतं.
दरम्यान, कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालय तसंच मंत्रालयातील काम बंद राहण्यासाठी हे आंदोलन सुरू राहिलं असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनाने दिला होता. बेकायदा काम करून घेण्यासाठी बच्चू कडू हे गवित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतीश पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधलं होतं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!