Share

अनुपम खेर यांना ‘हॅपी बर्थ डे’ साठी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ पुरस्काराने केले सन्मानित

Published On: 

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची सिनेसृष्टीत एक उत्तम कलाकार म्हणून ओळख आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. यातच आता अनुपम खेर यांना न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मसाठी त्यांना ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा मुख्य भूमिकेत आहेत.

बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला.  ते म्हणाले की, न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे खूप आभार आहे. या फिल्म फेस्टीव्हलमध्ये बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून माझा गौरव होणं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. याचं सगळं श्रेय ‘हॅपी बर्थडे’ च्या सगळ्या टीमला तसंच माझी सहकलाकार अभिनेत्री अहाना कुमरा यांना जाते.”

हा लघुपट प्रसाद कदम यांनी दिग्दर्शित केला असून निर्मिती एफएनपी मीडियाने केली आहे. यावेळी शॉर्टफिल्मचे निर्माते गिरीष जौहर म्हणाले की, ” अनुपम खेर एक ग्लोबल आयकॉन आहेत. आहना कुमरा यांनाही नामांकन मिळाले होते. सर्वांनीच आपापल्या परीने उत्तम कामगिरी केली आहे. ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मला न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिल्म’ आणि अनुपम खेर यांना बेस्ट अ‍ॅक्टर असे दोन पुरस्कार मिळाल्यामुळे मनापासून आनंद होतो आहे.  ‘हॅपी बर्थडे’ ही शॉर्टफिल्म लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!