बारामती : आपल्या राज्यातील शेतीपंपाचे ४० हजार कोटी रुपये थकले आहेत. यामुळे महावितरण, महापारेक्षण कंपन्या अडचणी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने थकीत विजबिलासाठी नवीन योजना आणली आहे. ५० टक्के वीज बिलात सवलत देऊन राहिलेले वीजबिल भरण्याची योजना आणली. ते नाही भरल्यास अडचणीत याल तुमची वीजबिल कट होईल याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. ते बारामतीत एका पतसंसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.
सरकारने शेतीपंपासाठी निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरु केली आहे. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली वीजबिले अदा करावीत. अन्यथा महावितरण कंपनी आणि पर्यायाने शेतकरीही अडचणीत येतील, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
ग्राहकांनी वीजबिल न दिल्यामुळे महावितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महसुली तूट वाढल्यामुळे महावितरणला आपला कारभार करण्यासाठी कसरत करावी लागतीये. त्यामुळे सरकारने थकित वीजबिलाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल ७१ लाख ६८ हजार ५९६ विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आले आहे.
निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास विजजोडणी कापण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. वीजबिल भरण्यासाठीची मुदत ३० जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर विजेची जोडणी कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याच काम करत आहे : प्रियांका गांधी
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने ‘महाराष्ट्रातचं’ होणार ?
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात


