Share

औरंगाबाद मनपाला गांधी पुण्यतिथीचा विसर, काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

Published On: 

औरंगाबाद : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शनिवारी (दि.३०) शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असूनही औरंगाबाद महानगरपालिकेकडून पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आलेला नाही. याविषयी शहर काँग्रेसने निषेध व्यक्त केला.

औरंगाबाद मनपावर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, मुदत संपल्याने आणि कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासक म्हणून आयुक्त आस्तिक कुमार पांडेय सध्या काम पाहात आहेत. शिवसेनेने नाही, किमान पांडेय यांनी तरी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करायला हवे होते, अशी भावना गांधीप्रेमींनी यानिमित्त व्यक्त केली.

दरम्यान, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी यांनी स्वतः पुढाकार घेऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पाण्याने धुऊन स्वच्छ केले व सर्व परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वच्छता केली व महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी सरोज मसलगे पाटील, मोहसिन अहमद, एम. ए .अजहर, मोईन शेख हरसुलकर, जी. एस एअन्सारी, गुलाब पटेल, मुदस्सर अन्सारी, सलीम खान, अबेदा बेगम, घोरपडे ताई, अरुण शिरसाठ, लियाकत पठाण, इमरान शेख, संतोष भिंगारे, मोहम्मद एहेतेशाम, मुजम्मिल शेख, सुनील वाहुळ, किशोर खरात, शेषराव तुपे पाटील, प्रशांत लाखोले, साहेबराव बनकर, विजय गायकवाड, विनोद उटवाल, अमजद खान, फैसल खुरेशी, स्य्यद हमिद, अलंकरत योतेकर, एजाज शेख, राजू राठोड आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!