मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास केल्याचा आरोप भाजपने केला होता. या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पाठक यांनी याचिकेत केली आहे. आता नितीन राऊतांना 28 जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
या प्रकरणी भाजप नेते विश्वास पाठक यांच्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नितीन राऊतांना 28 जुलैपर्यंत उत्तर देण्यास हायकोर्टाने सांगितलं आहे. विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पाठक यांनी याचिकेत केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कुणालाही खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसांचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणकडे मंत्र्याने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवास खर्चावर खर्च करण्यासाठी पैसा आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन करून खासगी विमानातून सरकारी खर्चाने प्रवास केला आहे असा आरोप आहे.
नियमांचं उल्लंघन केल्याने नितीन राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हटवावं अशीही मागणी विश्वास पाठक यांनी केली आहे. तसंच, लॉकडाऊनच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १२ जून, २ जुलै, ६ जुलै रोजी मुंबई-नागपूर, तर ९ जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर , दिल्ली असा चार्टर्ड फ्लाईटने प्रवास केल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत ‘महानिर्मिती’ कडून समजल्याचा दावा पाठक यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- ‘महानायक अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची ‘प्रतिक्षा” ; बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर
- ‘किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा’
- ‘आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच झालयं…’


