नांदेड : बॅंकेचे कर्ज त्यातच अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान या नैराश्यातून पाटोदा (ता. नायगाव) येथील अंबादास दिगांबर शिंदे (वय ५५) यांनी शनिवारी (ता. १६) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी देशोधडीला लागत असून, अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बॅक वॉटरच्या पाण्याचा फटका बरबडा परिसरातील बहुतांश शेतीला बसला आहे. पाटोदा हे गाव बरबडा जिल्हा परिषद गटामध्ये येते.
पाटोदा येथे अंबादास शिंदे यांची शेती असून, त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने अंबादास शिंदे खचून कर्ज कसे फेडावे या नैराश्याने त्यांना ग्रासले होते. शेवटी पाटोदा शिवारातील स्वतःच्या शेताच्या धुऱ्यावरील झाडाला त्यांनी गळफास घेतला. मुलगा संदीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत जाहीर करण्यात आलेली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच शेतकऱ्याच्या आत्महत्येचे सत्र सुरू असल्याने चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
