🕒 1 min read
मुंबई : मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक प्रकरणाचा तपास आधी एनआयएकडे गेला. यादरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझेच आरोपी झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. आता मनसुख हिरण मृत्यू प्रकरण एनआयएकडे जाण हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरण हे एकमेकांशी निगडित होतं. त्यामुळे मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा एनआयएकडे जाणं जवळपास निश्चितच मानल जात होतं. मात्र आज अधिकृतरित्या हा तपास त्यांच्याकडे गेला आहे.
Mansukh Hiren death case taken over by NIA. Formal order from MHA issued to NIA regarding this. This case was earlier being investigated by Maharashtra ATS: Official Sources pic.twitter.com/mT06nzYc8Y
— ANI (@ANI) March 20, 2021
राज्य दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरन मृत्युप्रकरणाचा तपास करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी विरोधीपक्षाकडून करण्यात येत होती. तर एनआयए फक्त मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास करत होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील वारंवार असा तपास सुरू असल्याचे सांगत होते.
मात्र अखेर या प्रकरणांचा तपास एनआयए करणार आहे. एनआयए आता एटीएसकडे असलेल्या सर्व तपासाचा तपशील आपल्याकडे घेणार आहे.
मनसुख हिरण मृत्यू प्रकरण आता एनआयएकडे गेल्यानंतर सचिन वाझे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान, मंगळवारी मतमोजणी
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

