🕒 1 min read
परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या 14 जागांकरिता रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. तर संचालकांच्या 21 जागांकरिता निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. तर सात संचालक बिनविरोध निवडून आले.
त्यामुळे 14 जागांसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत 14 जागांसाठी मतदान होणार आहे. परभणी जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिंतूर जिल्हा परिषद प्रशाला, सेलू जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पाथरी जिल्हा परिषद शाळा, मानवत केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनपेठ जिल्हा परिषद शाळा, गंगाखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पालम जिल्हा परिषद शाळा तसेच पूर्णा जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात मतदान होणार आहे. सहकार विभागातील पाच वरिष्ठ अधिकारी, 115 कर्मचार्यांची निवडणुकीच्या कामाकरित नियुक्ती केली आहे. परभणी जिल्ह्यात नऊ व हिंगोली जिल्ह्यात पाच ठिकाणी मतदान केंद्रे केले आहेत. या मतदान केंद्रावर एक हजार 570 संस्थांतर्फे त्यांचे प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या निवडणुका सुरळीत व्हाव्यात, या दृष्टीने कठोर उपाययोजना केल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अतिरीक्त पोलिस अधिकार्यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत. जमाव बंदी कलम मतदान केंद्र परिसरात लागू केले. केंद्रावर मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणास बंदी आहे. मतदान केंद्रावर सॅनिटायझर, सामाजिक अंतर व मतदारास मास्क बंधनकारक केले आहे. मतदानाच्या टप्यात सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी बजावले आहेत.
मतदानाचा टप्पा पूर्ण झाल्याबरोबर सीलबंद मतपेट्या परभणीत जायकवाडी वसाहतीतील कल्याण मंडपम् स्ट्राँगरुममध्ये जमा केल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. कडक पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. दरम्यान आठ टेबलची व्यवस्था केली आहे. प्रत्येक टेबलवर प्राथमिक कृषी पतपुरवठा, सेवासहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष संस्थांची तालुकानिहाय मतमोजणी होणार आहे. दुसर्या फेरीत कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया यांची मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, निरीक्षक शंकर बर्गे, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरात येताय, सावधान! ‘स्वॅब’से करेंगे सबका स्वागत
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

