🕒 1 min read
नांदेड : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. अंतापूरकर यांना ३० व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ७८९ मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली. जितेश यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे जितेश यांच्या विजयी मतांची आघाडी त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ विधानसभेच्या आघाडीपेक्षा दुप्पट आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, तीन पक्षात प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला होता. यासाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले. आज मंगळवारी मतमोजणी पार पडली.
दादरा नगर हवेलीतही भाजपाला धक्का
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेच्या मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या महेश गावित यांचा पराभव केला. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63,382 मते मिळाली. भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालामुळे भाजपला मोठी हार पत्कारावी लागली असून चांगलाच धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे कपडे आणि वस्तूवरून केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर
- ‘असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा’; खोतांचा राष्ट्रवादीला टोला
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
