मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ३ एकदिवसीय आणि टी-२० सामने आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय महिला संघाच्या टी-२० संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौर करणार आहे. तर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. या दौऱ्यात बीसीसीआयने मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर आणि यस्तीका भाटिया या तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. या तीन खेळाडूंचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण होण्याची शक्यता आहे.
???? NEWS ????: India Women’s squad for one-off Test, ODI and T20I series against Australia announced. #TeamIndia #AUSvIND
More Details ????
— BCCI Women (@BCCIWomen) August 24, 2021
भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला १९ सप्टेंबर रोजी सुरुवात होईल आणि ११ ऑक्टोबर रोजी अखेरचा सामना खेळवण्यात येईल. दौऱ्याची सुरुवात १९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय मालिकेद्वारे होईल. १९, २२ आणि २४ सप्टेंबर या दिवशी एकदिवसीय सामने खेळवीण्या येईल. तर ३० सप्टेंबरपासुन दौऱ्यातील एकमेव कसोटीला प्रारंभ होईल. टी-२० मालिका १.,९ आणि ११ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेंच्या अटकेसाठी मंत्री परबांचा पोलिसांवर दवाब! राऊत म्हणतात, ‘मग त्यात चुकीचे काय?’
- सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी नारायण राणे हायकोर्टाची पायरी चढणार
- ‘अशा धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देईन!’- प्रसाद लाड
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही


