Share

राणेंच्या अटकेसाठी मंत्री परबांचा पोलिसांवर दबाव! राऊत म्हणतात, ‘मग त्यात चुकीचे काय?’

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागे एका राजकीय नेत्याचा दबाव आहे, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला बळाचा वापर करून अटक करण्याची सूचना देत आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यावर भाजपने आक्षेप नोंदवत हा मातोश्रीवरुन सगळा प्लॅन ठरला होता. आता परब यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत, अशी आक्रमक भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली. भाजपाच्या या भूमिकेवर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय? कारण ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ते पोलिसांना सूचना करु शकतात, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

मंगळवारी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची सभा होती. त्या सभेनंतर पत्रकार परिषद सुरू होण्याआधी पालकमंत्री अनिल परब यांचे दोन फोनवर संभाषण झाले. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले होते अनिल परब?
‘हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन (अर्ज) नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा,’ असं अनिल परब फोनवर बोलताना ऐकू येत होतं.

दरम्यान, भाजपने आता परब यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे. राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.राणे यांच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचा आरोप होत असलेल्या अनिल परब यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!