Share

नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हटवल्याने तणाव, राजकीय दबावातून लाठीमार झाल्याचा आरोप

Published On: 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील गऊळ (ता.कंधार) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवल्याने तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, कंधार पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवळपास ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथे मध्यरात्री अज्ञातांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने सायंकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविण्यात आला. यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गऊळ येथे बसस्थानका शेजारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी नियोजित जागा आहे. सकाळी हा पुतळा दिसताच ग्रामस्थही अवाक् झाले. पोलिसांना कोणताही थांगपत्ता न लागू देता अज्ञातांनी पुतळा बसवला. मात्र, सकाळी पोलिसांना पुतळा दिसल्यानंतर गावात वाद सुरू झाला. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवा अशी भूमिका पोलिसांनी घेतली. पुतळा बसविण्यास विरोध नाही. पण रितसर परवानगी घेऊन तो बसवावा अशी सूचना पोलिसांनी केली. पण त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करू अशी भूमिका त्यांनी मांडली.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रितसर परवानगीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत हा पुतळा हटवू नये असे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण पुतळा हटवू देणार नाही अशी भूमिका गावातील काही ग्रामस्थांनी घेतली आहे. यानंतर उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या उपस्थितीत पुतळ्याची संरक्षण समिती स्थापन करण्यात आली.

मात्र, समिती स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठा फौजफाटा नेत लाठीमार करत पुतळा हटवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी काहींनी विरोध केला असता त्यांच्यावर लाठीमारही करण्यात आला. त्यात अनेक जण जखमी झाले अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तर दुसरीकडे पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जवळपास ४० जणांवर गुन्हा ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून कलम ३५३,३३२,१४५,१४७, ३३६,१४८,१४९,१८८,५०४,३०५ नुसार गु्न्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे.

राजकीय हस्तक्षेपातून पुतळा हटवला
लोकशाहीर अण्णाभाऊंचा पुतळा गावात उभारावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीने नियोजित जागाही दिलेली आहे. मात्र, राजकीय दबावापोटी अद्यापही पुतळा बसवण्यात आला नव्हता. परंतू अज्ञातांनी अचानकपणे पुतळा बसवला. यामुळे गावात खळबळ उडाली. मात्र, तरीही ग्रामस्थांनी समोपचाराने हा प्रश्न मिटवत समिती स्थापन केली. दरम्यान, एका मंत्र्याच्या मर्जीतील राजकीय पुढाऱ्याने पोलिसांना हाताशी धरून पुतळा हटवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच त्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी लाठीमार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!