Share

औरंगाबादेत ९ झोनमध्ये कौशल्य विकास केंद्राची होणार सुरुवात; गरीब व गरजूंना घेता येणार लाभ!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९ झोनमध्ये लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. प्रशासक यांच्या दालनात मंगळवारी (दि.३१) मनपा, स्मार्ट सिटी आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. शहरातील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक, युवती विद्यार्थ्यांना कौशल्य विकास साधण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या हेतूने औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लाइट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्यामध्ये १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पाअंतर्गत महानगर पालिका क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक युवती व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. १६ मार्चपासून सहा कोर्सेस सुरू झाले आहेत. यातील १२ विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळाली आहे. आज पर्यंत २०० विद्यार्थ्यांनी यात नाव नोंदणी केली असून शहरातील विविध ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाला स्टरलाईट टेक्नॉलॉजीस अर्थ साहाय्य करत आहे. लाईट हाऊस मध्ये फाउंडेशन मध्ये फाउंडेशन कोर्स, समुपदेशन कोर्स, कौशल्य विकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी असतील.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!