🕒 1 min read
मुंबई : भारतात सध्या आयपीएल २०२२ (IPL 2022)चा थरार सुरु असताना टीम इंडियाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंड येथे सुरू आसलेल्या काउंटी चॅम्पियनशिप २०२२ (County Championship 2022)मध्ये ससेक्स (Sussex) संघाकडून खेळत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने भारतचा कसोटी स्टार चेतेश्वर पुजारासोबत इंग्लड काउंटी क्रिकेटमध्ये डेब्यू केलं आहे. सध्या काउंटी क्रिकेटमध्ये पुजारा चांगलाच फॉर्मात आहे. दरम्यान, पुजारासोबत पदार्पण केलेल्या रिझवानने भारतीय खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा दोन देशांच्या खेळाडूंमध्ये संघर्ष होतो तेव्हा तो फक्त मैदानापुरता मर्यादित असतो. मैदानाबाहेर सगळे क्रिकेटपटू एका कुटुंबासारखे असतात, असे रिझवानने म्हटले आहे. रिझवान आणि पुजारा हे संघ ससेक्सकडून एकत्र खेळत आहेत. यावेळी रिझवानने पुजाराचे कौतुकही केले आहे.
For Mohammad Rizwan, the cricketing world is one big family ????
More ???? https://t.co/W6nsD6gE81 pic.twitter.com/5KRtJuJvTx
— ICC (@ICC) May 15, 2022
एका मुलाखती दरम्यान रिझवानने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मोठे वक्तव्य केलं आहे. क्रिकेट जग हे आमच्यासाठी माझ्यासाठी एक कुटूंब आहे. जर मी माझा विराट माझा पुजारा म्हटलं तर ते चुकीचं नाही. इतकेचं नव्हे तर स्टिव्ह स्मिथ असेल किंवा जो रुट हे देखील माझेच आहेत. यामध्ये काहीही चुकीचे नाही. कारण क्रिकेट हे कुटूंबासारखे आहे. असे मोठे वक्तव्य रिझवानने केले आहे.
रिझवानने आत्तापर्यंत पाकिस्तानकडून २२ कसोटी, ४४ एकदिवसीय आणि ५६ टी-२० मॅच खेळल्या आहेत. रिझवानच्या खात्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये १११२, ८९७ आणि १६६२ धावा नावावर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
