Share

‘अनिल परब यांनी परिवहन खात्याची वाट लावली’, निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. यावर एका वृत्तपत्रात बातमी छापून आली आहे. ही बातमी ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाना साधला आहे.

‘सध्या परिवहन मंत्री गायब आहेत, वाट लावली या माणसाने परिवहन खात्याची’. अशा शब्दात निलेश राणेंनी परबांवर निशाना साधला आहे.

रत्नागिरी डेपोतील कार्यशाळा कर्मचारी दिनेश पवार यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून ते सेवेत होते. कर्जबाजारीपणा आणि तोकडा पगार यामुळे ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरातील एसटी कर्मचाऱ्यांची ही तीसावी आत्महत्या आहे. यात रत्नागिरी आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

होय माझ्या आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार

रत्नागिरीतील एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!