Share

अनिल परबांच्या अडचणीत वाढ; किरीट सोमय्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मत्री यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले होते. दापोलीत अनिल परब (Anil parab) यांनी दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दापोलीतील अनिल परब यांच्या रिसॉर्ट संदर्भात माहिती देत परब यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारचे मंत्री अनिल परबांचा दापोली रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. तो आत्ता रद्द करण्यात आला आहे, असे एफिडेविट महाराष्ट्र शासनाने काल लोकायुक्त यांच्या कडील सुनावणीत दाखल केले असल्याचे ट्विट करत किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळातील मंत्रीच अनधिकृत बांधकाम करत आहे. सचिव रिसॉर्ट अनधिकृत घोषित करतात. तरीही उद्धव ठाकरे परब यांना मंत्री म्हणून कायम ठेवतात. परब यांची हकालपट्टी तर होणारच. पण त्यांच्याविरोधात फौजदारी आणि सिव्हील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!