मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केलं आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. यानंतर आता अनिल परब हे आज ईडी कार्यालयात हजर झालेले आहेत. दरम्यान सकाळी ११ वाजल्यापासून अजूनपर्यंत अनिल परब हे ईडी कार्यालयातच असून त्यांची कसून चौकशी चालू असल्याचे दिसत आहे.
सकाळी ईडी कार्यालयात जाण्याआधी अनिल परब यांनी माध्यमांशी सवांद साधला होता. यावेळी ते म्हणाले होते कि, ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं अनिल परब यांनी सांगितले होते.
त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. परब हे शिवसेनाप्रमुखांची शपथ का घेतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाही?, असा खोचक सवाल करतानाच अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राणेंच्या विधानावर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.
तसेच यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले कि, ‘कडवट शिवसैनिकाला आता भाजपच पर्याय आहे. अनिल परब हे सकाळी उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय शर्ट पण घालत नाहीत. अशा व्यक्तीला तुम्ही चौकशीला बोलावल्यावर उद्धवजींच्या छातीत धडकी भरल्यासारखं झालं आहे. अनिल परब तो झांकी है उद्धव ठाकरे अभी बाकी है,’ असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टी ग्रस्त औरंगाबादकरांना मिळणार दिलासा; काँग्रेसच्या मागणीला मंत्री वडेट्टीवारांच्या निर्णयामुळे यश!
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून


