Share

अतिवृष्टी ग्रस्त औरंगाबादकरांना मिळणार दिलासा; काँग्रेसच्या मागणीला मंत्री वडेट्टीवारांच्या निर्णयामुळे यश!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहरातील गरीब नागरिकांना मदत करण्याची मागणी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मागणीला यश आले आहे.

औरंगाबाद शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गरीब नागरिक तसेच छोट्या व्यापाऱ्यांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस कमिटीने केली होती. यावेळी वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीदरम्यान शहरात झालेल्या मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी असे आदेश दिले. तसेच काँग्रेस पक्षाच्या बैठकीतही औरंगाबाद शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे गरीब कुटुंबीय तसेच लहान-लहान व्यापारी यांना शासनातर्फे मदत करण्यात येईल असे जाहीर केले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासन नेहमीच तत्पर असून सामान्य माणसाला या मुसळधार पावसामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीबाबत त्वरित शासनातर्फे मदत करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी विजय वडेट्टीवार यांना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानीबाबत सविस्तरपणे माहिती दिली. या कार्यक्रमात डॉ. कल्याण काळे, हिशाम उस्मानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी इब्राहिम पठाण, नामदेव पवार, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!