🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनीही महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. आंदोलनाच्या मुद्द्यावरून मंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.
‘परिवहन आणि विधिमंडळ अशी दोन्ही खाती यांच्याकडे आहेत. ते मातोश्रीचे वसुली मंत्री आहेत. ज्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपद भोगत आहात, त्यांची विचारपूसही तुम्ही करत नाही. तुम्ही आई-वडिलांनाच विसरून जात आहात. अनिलजी, तुम्ही इथे आलात तर कुणी मारणार नाही. तसेही तुम्ही पोलिसांना हँडल केले आहे, असा टोला मेटे यांनी परब यांना लगावला आहे. आपल्या लोकांमध्ये या आणि आपण चर्चा करू, असा सल्लाही त्यांनी दिला.
तर दुसरीकडे वसुलीच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनीही परब यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘अनिल परब यांना बदाम पाठवा, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्याला काही कळत नाही. हा जी वसुली करतो ती सर्व उद्धव ठाकरेंना द्यावी लागते. उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया झाली. पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का? असा प्रश्न पडतो. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नाही. विलीनीकरण झाले तर अनिल परब वसुली कशी करणार?’ अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम
- जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस; काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त वक्तव्य
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’


