टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इंकामिग होत आहे. तर आता लोकजागर मंच चे संस्थापक अनिल गावंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत सेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.गावंडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे विदर्भात सेनेची ताकद चांगलीचं वाढली आहे.
अनिल गावंडे हे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड या गावचे मूळ रहिवासी असून गेली दोन दशके सामाजिक कार्यात आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा घेऊन ते सामाजिक जीवनात उतरले. मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघाची युवक आघाडी असलेल्या संभाजी ब्रिगेडपासून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून ते या संघटनेत सक्रिय होते. तरुणाईला नवी दिशा देणारे अनेक उपक्रम त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवले. यासोबतच त्यांनी मा. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीतही अनेक वर्षे काम केले. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी लोकजागर मंच या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत.
शेती प्रश्नाबद्दल काम करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच त्यांनी प्रसिद्ध शेतकरी आंदोलक आणि विचारवंत अमर हबीब यांच्या प्रेरणे तुन शेतकरी विरोधी कायदे संपविण्यासाठी उभे राहिलेल्या किसानपुत्र आंदोलनातही ते सक्रिय आहेत. ग्रामीण भागातील तरुण तरुनीना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि त्यांना संदर्भसाठी उपयुक्त पुस्तके मिळावीत म्हणून अकोला जिल्ह्यात 4 ठिकाणी मोफत अभ्यासिका आणि वाचनालय उघडण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यात सामजिक कार्य सुरू असतानाच ते गेली 15 वर्षेहून अधिक काळ मुंबईतही व्यवसायानिमित्त सक्रिय आहेत. त्यांच्या कामाची व्याप्ती कॉर्पोरेट क्षेत्रातही आहे. ते विविध कंपन्याचे प्रकल्प अंमलबजावणी आणि आखणी विषयक सल्लागार आहेत. त्यामुळं त्यांच्या सारख्या प्रशासनाची जाण आणि ग्रामीण समस्यांचे ज्ञान असलेल्या लोकनेतृत्वाचे येण्याने ग्रामीण भागात विशेषतः विदर्भात शिवसेना भक्कम होण्यास हातभारच लागणार आहे.
- सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना हा भावनिक राजकारणाचा भाग नाही ना?
- ‘सावरकरांच्या विरोधकांना चौकात घेऊन फटकावले पाहिजे’
- ‘विटंबनेचे कृत्य वाईटच, सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे’
- ‘विनाशकाले विपरीत बुद्धी, पुतळ्याला काळे फासून सावरकरांचे विचार संपणार आहेत का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

