🕒 1 min read
नागपूर : १०० कोटींच्या खंडणीचा आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांच्या नागपूर येथील निवासस्थानात जवळपास दहा तासांहुन अधिक झाडाझडतीनंतर सीबीआयचे अधिकारी बाहेर पडले आहेत. यावेळी त्यांनी महत्वाच्या कागदपत्रांसह लॅपटॉप, प्रिंटर सारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील सीबीआयच्या टीम ने ताब्यात घेतले आहेत. तर, अनिल देशमुख यांची चौकशी देखील सीबीआय अधिकारी यांनी केल्याचे समजत आहे.
दरम्यान, सीबीआयची टीम घरातून जाताच काही क्षणात अनिल देशमुख हे देखील आपल्या दौऱ्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.’ अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- राज्यात लवकरच मोफत लसीकरण ? अजित पवारांनी दिले संकेत


