औरंगाबाद : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे औरंगाबाद मधील सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शविला आहे.
सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊनच हा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे, जिल्हाध्यक्ष संभाजी वाघ यांनी केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नाभिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. वर्षभरापासून आधीच नाभिक बांधव संकटग्रस्त अवस्थेत आहेत. कोरोनामुळे व्यवसायावर दूरगामी परिणाम झाल्याने सलून व्यावसायिक बांधव आधीच मोठ्या अडचणीत आहेत.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील १६ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. ह्यावर्षी सलून व्यावसायिकांवर भयावह परिस्थिती आहे. शासनाने सलून बंद या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. शासनाने सलून व्यावसायिक आणि नाभिक बांधवाना भरघोस आर्थिक मदत करावी. योग्य नियम आणि अटींच्या आधारावर सलून दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी विष्णू वखरे, संभाजी वाघ, अप्पासाहेब दळवी, संजय औटे, सुदाम पंडित, सोमनाथ दळवी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
- ‘देशमुखांच्या निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

