🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
यानंतर, नैतिकता लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपने विविध प्रकरणांवरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी गेले काही महिने अक्षरशः रान उठवले होते. आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विविध नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उठवत अनिल देशमुख यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उभे केले होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. आता नवा वसुली मंत्री कोण ? असा प्रश्न निर्माण होतोय. एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही,’ असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
Home Minister of Maharshtra @AnilDeshmukhNCP Finally Resigns !
Now the question arises that who will be the New Vasooli Minister??
Change of face won't change the Corrupt intentions of the MVA Government.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra#AnilDesmukh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- कडक लॉकडाऊनचे निव्वळ ‘ख्वाब’, आम खास मैदानावर शेकडोंचा ‘मॉब’!
- मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा
- गृहमंत्र्यांचा राजीनामा ! आता कोण होणार महाराष्ट्राचा नवा गृहमंत्री ?
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
- मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
