पुणे : गेल्या काही दिवसांत एका ८५ वर्षीय आजीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. ही आजी काठ्या फिरवतांनाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे या आजीचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांकडून त्या आजीला मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
ही आजी पुण्यातील हडपसर येथील असून सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आली आहे. पुण्यातील शांता बाळू पवार या ८५ वर्षीय आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या आजी पोट भरण्यासाठी रस्त्यावर काठ्यांचा खेळ करत कसरत करत आहेत.
Can I get her details please. Wanna open a small training school with her where she can train women of our country some self defence techniques . https://t.co/Z8IJp1XaEV
— sonu sood (@SonuSood) July 24, 2020
या आजी हडपसरमध्ये वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांची चार मुलं व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. त्यातील तीन नातवंडांचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत.
दरम्यान, आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते शांताबाई पवार यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरवण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, आजी या वयातही परिवार चालविण्यासाठी काम करतात. त्यांना शासकीय योजनेतून योग्य ती मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्यसंपन्न असल्याचे दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या-
सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ झाला लीक
‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!
संजय राऊतांनी दिल्या वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

