🕒 1 min read
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुलै रोजी मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २४ जुलै (शुक्रवारी) रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला आहे. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे.
‘दिल बेचारा’ हा लीक झालेला चित्रपट हा HD क्वालिटीचा आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आला. या चित्रपटाला सर्वाधिक IMDb रेटिंग मिळाली आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट पाहून असंख्य चाहते भावूक झाले. प्रदर्शनानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर ट्रेण्ड होऊ लागला. चित्रपटातील सुशांतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
‘दिल बेचारा’ या या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. त्याचप्रमाणे मुकेश छाबडाने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. दरम्यान, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात यावा अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.
उद्यापासून 31 जुलैपर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट
सुपरहिरोंना करोनाचा फटका; ‘हे’ चित्रपट गेले लांबणीवर
‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन दोन दिवस आधीच संपला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
