🕒 1 min read
मुंबई : १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रविवारी सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उउडाली आहे. आता अनिल देशमुख यांना दुपारी १२च्या सुमारास विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
१०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर काल (१ नोव्हेंबर) अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देशमुखांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुपारी १२च्या सुमारास विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता. pic.twitter.com/WfBiN3ALKD
— Maharashtra Times (@mataonline) November 2, 2021
दरम्यान, काल ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी देशमुख यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. ज्यात ते म्हणाले होते की, ‘परमबीर सिंह आणि सचिन वाझेसारख्यांच्या आरोपांवर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. ३० वर्षांच्या सामाजिक-राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. पण जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला आणि सचिन वाझे जो अनेकदा तुरुंगात गेला, आज खुनाच्या आरोपात तुरुंगात आहे त्यांच्या आरोपावरून माझी ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे, ही दुःखाची गोष्ट आहे.’
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अटक करण्यात आली; राष्ट्रवादीचा आरोप
- ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’, महेबूब शेख यांचा भाजपाला टोला
- ‘सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने झाले तरी… ‘, नवाब मालिकांचा घणाघात
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

