🕒 1 min read
बीड : येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना अभियंता दंडे प्रतिनियुक्ती प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. सोनपेठ येथे कार्यरत सतीश दंडे या शाखा अभियंत्याकडे बीड नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार देण्याबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांच्या नावे बनावट पत्र तयार करण्यात आले होते.
यावर अमर नाईकवाडेंनी तक्रार दाखल केली होती. यानूसार बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगराध्यक्षांवर नगर परिषद कायद्याअंतर्गत अपात्रतेची कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुनावणी घेत हे आदेश दिले.
याबाबत सविस्तर असे की, बीड पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पालिका प्रशासन अधिकारी मिलिंद सावंत यांच्याकडे २ फेब्रुवारी २०१९ ते १३ मे २०१९ पर्यंत देण्यात आला होता. परंतु त्यानंतरही त्यांनी २७ जून २०१९ रोजी नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने सार्वजनिक बांधकाम औरंगाबादचे मुख्य अभियंता यांच्याकडे विनंती करून एस.सी.दंडे यांना विविध रस्ते विकास कामासाठी उपअभियंता पदाचा अतिरिक्त पदभार देण्यासाठी विनंती केली. पद रिक्त नसतानाही प्रतिनियुक्तीवर नियुक्ती चूक आहे. हाच धागा पकडून अमर नाईकवाडेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व मुख्य अभियंता यांना रिक्त पद नसताना सुद्धा प्रतिनियुक्तीवर नेमणूक करता येत नसल्याचे सांगितले. तसेच २७ जून २०१९ रोजीचे पत्र बनावट आहे. नाईकवाडेंनी वादातील पत्र मागवले तेव्हा ते नाही असे सांगितले. परंतु सुनावणीदरम्यान ते सादर केले, यासारख्या मुद्यांवर ठपका ठेवत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई, तर सावंत व मुख्य अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वादातील प्रत उपलब्ध नाही, असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही मुख्याधिकारी यांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्यात.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

