🕒 1 min read
वैजापूर : पोलिसांनी रविवारी (७ फेब्रुवारी) लासूरगाव येथे एका घरावर छापा टाकून ३८ किलो ६३२ ग्रॅम गांजा हस्तगत केला. या गांजाची किंमत दोन लाख ७२ हजार ५२४ रुपये आहे. याप्रकरणी शेख अशफाक शेख रज्जाक (५०) यास अमली पदार्थ कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
लासूरगाव येथे एका घरातून चोरट्या मार्गाने गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, उपनिरीक्षक विजय जाधव, रमेश जाधवर, रज्जाक शेख, शिवाजी मद्देवाड, जालिंदर तमनार, सागर बोराडे, प्रशांत गीते, गणेश पैठणकर, विशाल पैठणकर, अमोल मोरे, महेश बिरुटे, अजय बावस्कर, गोपाल जोनवाल व महिला.कर्मचारी कविता पवार यांच्या पथकाने दुपारी बाराच्या सुमारास लासुरगाव येथे घरावर छापा मारला.
पोलिसांनी या छाप्यात घराची झडती घेतली असता प्लॉस्टिकच्या तीन पोत्यांमध्ये वेगवेगळ्या वजनाचा गांजा चोरटी विक्री करण्यासाठी ठेवलेला आढळुन आला. त्याचे एकुण वजन ३८ किलो ६३२ ग्रँम असुन एकुण किंमत दोन लाख ७२ हजार ५२४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शेख अशफाक यास अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक निलेश केळे यांनी फिर्याद दिल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा कलम २०(क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक राजपूत करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी


