🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. गेल्या ११ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला आठवडाभरात सुनावणी करून लवकरात लवकर निर्णय देण्यास सांगितले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती एनजे जमादार यांनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज मंजूर केला असून त्यांना दिलासा दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा जामीन ईडीच्या खटल्यात देण्यात आला आहे. त्यामुळे आता सीबीआयच्या प्रकरणातही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
तर देशमुख कारागृहातून बाहेर येऊ शकतात-
अनिल देशमुख यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. एक ईडीचा गुन्हा त्याचबरोबर दुसरा सीबीआयचा गुन्हा. सध्या त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यांना सीबीआय गुन्ह्यामधून दिलासा मिळाला तर ते कारागृहातून बाहेर येऊ शकतात.
११ महिन्यांपासून अनिल देशमुख होते कारागृहात –
हायकोर्टाने अखेर अनिल देशमुख यांनी जामीन मंजूर केला आहे. गेल्या ११ महिन्यांपासून अनिल देशमुख कारागृहात होते. दरम्यान अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित वसूली प्रकरणात अनिल देशमुख हे कारागृहात होते. २ नोव्हेंबरला ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती. १०० कोटी वसूली प्रकरणात ही अटक करण्यात आली होती. हे प्रकरण अनेकदा सत्र न्यायालयात आलेले होते. त्यानंतर हाय कोर्टात गेले होते. मात्र सुनावणी झाली नव्हती. नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऑर्डरनुसार हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली आणि अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Cabinet meeting । “शिधापत्रिकाधारकांना दिवाळी भेट, पोलिसांना घरबांधणीसाठी कर्ज”; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे ६ निर्णय
- गौतम अदानी आणि Elon Musk यांना एका दिवसात 2 लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान
- Atul Bhatkhalkar | राहुल गांधी पंतप्रधान नाही, विको वज्रदंतीचे अॅम्बेसिडर नक्की होतील- अतुल भातखळकर
- Rishabh Pant | ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने दिला ‘फ्लाइंग किस’! म्हणाली…
- Keshav Upadhye | “भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात…” केशव उपध्ये यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
