🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: कधीकधी आपल्याला छोट्या मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. पण नुकसान म्हटले तर आपल्याला नेहमी टेन्शन येते कारण नुकसान झालेले कुणालाही आवडत नाही. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना एका दिवसात सुमारे 25 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. एका अहवालानुसार, सोमवारी शेअर बाजारात या दोन्ही कंपन्यांचे शेअर घसरल्यामुळे या दोघांनाही हा तोटा सहन करावा लागला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतून गौतम अदानी आता तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अदानी कंपनी
सध्या शेअर बाजारामध्ये धुमाकूळ पसरलेली आहे. कारण अदानी पॉवर, अदानी विल्मार, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅससह गौतम अदानी यांचे युनिट शेअर मार्केटमध्ये कोसळले आहे. शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायात जवळजवळ 9.67 अब्ज डॉलर म्हणजेच 78,912 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
गौतम अदानी कंपनीचे नुकसान
अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीचा शेअर 7.90 टक्क्यावरून घसरून 3.076 रुपयांवर आला असून, अदानी विलमारचा शेअर 717.75 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर अदानी पॉवर 4.00 टक्क्यावरून घसरून 354.85 रुपयांवर आले आहे. तर अदानी इंटरप्राईजेस 8.42 टक्क्यांनी घसरून 3,164.75 रुपयांवर आले आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअरचा भाव 764.95 वर येऊन थांबला आहे. अदानी एनर्जीचा शेअर 7.65 टक्क्यांनी घसरून 2,087.85 रुपयांवर आला.
Elon Musk यांची कंपनी
एकीकडे अदानी कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले, तर दुसरीकडे Elon Musk च्या कंपनीला सुमारे $15 दशलक्ष म्हणजेच 1.26 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. कारण त्यांची ऑटोमोटिव्ह कंपनी टेस्लाचे शेअर्स तब्बल 8.6 टक्क्यांनी घसरले आहे. एवढे मोठे नुकसान होऊन सुध्दा Elon Musk जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
महत्वाच्या बातम्या
- Atul Bhatkhalkar | राहुल गांधी पंतप्रधान नाही, विको वज्रदंतीचे अॅम्बेसिडर नक्की होतील- अतुल भातखळकर
- Rishabh Pant | ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने दिला ‘फ्लाइंग किस’! म्हणाली…
- Keshav Upadhye | “भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात…” केशव उपध्ये यांचा टोला
- Election Commission | शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये, दोन्ही गटाकडे केली ‘ही’ मागणी
- Anil Deshmukh | मोठी बातमी! अनिल देशमुखांची दिवाळी गोड होणार?, न्यायालयाकडून जामीन मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
