Share

Keshav Upadhye | “भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात…” केशव उपध्ये यांचा टोला

Published On: 

मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अशातच काल राष्ट्रवादी कार्यालयात देवी सरस्वतीचं पूजन करण्यासाठी आमंत्रण पत्र शेअर करण्यात आलं होतं. यावरुन भाजप (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांची टीका :

केशव उपाध्ये यांनी निमंत्रण पत्राचा फोटो शेअर केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज सरस्वती पूजन, नेमका खरा चेहरा कुणाचा ? भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात सरस्वती पूजन करणार?, असे सवाल उपाध्येंनी उपस्थित केले आहेत.

केशव उपाध्ये यांचं ट्विट :

शेअर केलेल्या फोटोमध्ये ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता राष्ट्रवादी कार्यालयात देवी सरस्वतीचं पूजन असल्याने हजेरी लावावी, असं लिहिण्यात आलं आहे.

काय म्हणाले होतो छगन भुजबळ ?

दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.

भुजबळांवर गुन्हा दाखल :

चेंबूर येथील एका रहिवाश्याने भुजबळांचा व्हिडीओ शेअर केल्यावर त्याला मारण्याची धमकी भुजबळांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार देखील संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!