Share

हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खातं नाही- अनिल बोंडे

Published On: 

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विदर्भ दौऱ्यावर जोरदार टीका केली होती. अनिल बोंडेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी ट्विटरवर अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लीप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसे खोटे बोलत आहेत, हे दाखवणारी ऑडिओ क्लीप नवाब मलिक यांनी शेअर केली आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना बोंडे यांनीही आता प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार कधीच खोटे बोलत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यावर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, ‘शरद पवार कधीच खोटं बोलत नाही, असे संजय राऊत म्हणातात, हे तर असं झालंय की मांजर कधीच उंदीर खातं नाही’, असं म्हणत अनिल बोंडे यांनी संजय राऊतांना उत्तर देताना शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.

https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1461253711024443397?s=20

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!