Share

गर्मीत गारवा देणे आले अंगलट, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :उन्हाळा सुरु होताच लोकाना गारवा देणाऱ्या आईस्क्रीमचे दुकान उघडे ठेवणे दुकानदारास चांगलेच महाग पडले. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत आईसक्रीम पार्लरचे दुकान सुरू ठेवणा-या प्रविण ज्ञानेश्वर खिल्लारे (रा.सिडको एन-५, अरूणोदय कॉलनी) यांच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ पेâब्रुवारी रोजी घडली. सध्या शहरात रात्रीची संचारबंदी सुरू आहे.

पोलीस आयुक्त यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मागील काही दिवसांपासून रात्रीची संचारबंदी लावली आहे. त्या दरम्यान, पोलीस विनाकारण फिरणाऱ्या तसेच व्यवसाय करणाऱ्यावर कडी नजर ठेऊन आहे. सिडको भागात व्यवसायाच्या मोहाने आईस्क्रीमचे दुकान चालू ठेवणाऱ्या दुकानदारावर सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे आता रात्री फिरणारे तसेच व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. सध्या शहरात कोरोनाचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. त्यावर पोलीस देखील रात्रीच्या वेळी गस्त घालत विना कारण फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!