अहमदनगर : नेहमीच आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर पुन्हा एकदा अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यंदा त्यांनी युट्यूबर्सवर टीका केली असून पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकोल्यातील कौलखेड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने एका कार्यक्रमानिमित्त इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी बोलत असतांना इंदुरीकर महाराज म्हणाले की,‘चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचण्यात आले. यांचं वाटोळच होणार’, असे इंदुरीकर म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी कोरोनासंदर्भात बोलत असतांना ‘मी तर लस घेतली नाही तरी मी सगळीकडे फिरतो. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही’, असे खळबळजनक वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या :
- नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजार रुपये लवकरच देण्यात येणार – अजित पवार
- “तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर…”, धनंजय मुंडेंना निलेश राणेंचा जोरदार टोला
- बोगस किटकनाशकांमधून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक
- न्यूझीलँडचा संघ आयपीएल स्पर्धा खेळणार! कोच गॅरीने दाखवले हिरवे कंदील
- “तो सध्या कसोटीमध्ये पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ ऑल राऊंडर” आकाश चोप्राने केले जडेजाचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

