परभणी : शहरातील अष्टभूजा देवी चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांना सोमवारी वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी हटवत असताना दोघाजणांनी त्यांच्याशी हुज्जत घालत कारवाईस विरोध केला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात रात्री शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी वाव्हळे यांच्यासह अन्य एक महिला कर्मचारी सोमवारी सकाळी अष्टभूजादेवी चौकात कर्तव्य बजावत होत्या. मुख्य बाजारपेठ असल्याने सकाळच्या सुमारास येथे नेहमीच वाहतूकीची वर्दळ असते. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून तेथे उभ्या असलेल्या हातगाड्यांना तेथून इतरत्र जाण्यास वाहतूक शाखेच्या कर्मचारी वाहुळे यांनी सांगितले. मात्र, त्यावेळी दोघांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालत कारवाईस विरोध केला.
यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती तातडीने महिला कर्मचाऱ्यांनी वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांना दिली. माहिती समजताच काशीकर यांच्यासह अन्य कर्मचारी तसेच नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री दोघांविरूध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इथे तर चक्क पोलिसांनाच मारहाण करून लुटले !
- ‘या’ बँकांमध्ये तुमच खात असेल तर ही कामे १ एप्रिल पर्यंत करा अन्यथा…
- पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा; आरपीआयला उपमहापौर पद?
- इंधनाचे दर कमी होण्य़ाची मावळली; इंधन जीएसटीच्या कक्षेत आणलं जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – सीतारमण
- ‘अनुष्काकडून काही शिक’ ; बाळाला सोडून फिरणाऱ्या करीनाला नेटकऱ्यांनी दिला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
