मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाद सुरू असतानाच पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीवर टीका केली होती. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.‘देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत की असले १०० अजित पवार खिशामध्ये घेवून फिरतात’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत ‘अख्या भारताला तसेच पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना माहित आहे कि अजित दादा काय आहेत. तुम्ही काय खिशात १०० अजित पवार घेवून फिरण्याची भाषा करताय, तुमचे १०५ आमदार तुमच्या सहित मागच्या खिशात अजित दादांनी त्याच दिवशी गुंडाळले ज्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट उठवली’ अशी टीका केली. तसेच इतर नेत्यांनीही याचा निषेध केला.
दरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपांमध्ये भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ‘अजित पवार मोठे नेते नाहीत. शरद पवारांमुळे त्यांना राजकारणात संधी मिळाली, पण त्यांनी घाण केली अशी जहरी टीका राणे यांनी केली.
चंद्रकांतदादा अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाही, त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 21, 2021
‘चंद्रकांतदादा अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाही, त्यांना मोठा नेता मानण्याचे कारण देखील नाही. त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे. पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही’ या शब्दांत निलेश राणे यांनी टीका केली.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
सोमवारी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत कि असले १०० अजित पवार खिशामध्ये घेवून फिरतात. ते उद्धव ठाकरेंसारखे नाहीत कि सरकारमध्ये काय चालले आहे आणि नाही हेच ठावूक नाही. देवेंद्र फडणवीस हे असामान्य नेते आहेत, शिवसेनेने भयंकर त्रास देवून देखील ते ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले, ही सोप्पी गोष्ट नव्हती.’ असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गीतेंच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही’, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- ‘शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आघाडी नको असाच आवाज येईल’; सुधीर मुनगंटीवार यांची टीका
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’
- राष्ट्रवादीचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय-अनंत गीते
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

