🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील विविधमहत्वाच्या उड्डाणपूल आणि रस्त्यांचे भूमिपूजन आज केले जात आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते मंचावर उपस्थित होते.
दरम्यान, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहरासह जिल्ह्यात रस्त्यांची विविध कामे सुरु आहेत. रिंग रोड,महामार्ग, रस्ता रुंदीकरण आदी कामांसाठी कंत्राटदार संथगतीने काम करत असल्याचे समोर येत आहे. कंत्राटदारांच्या या कामाचा पद्धतीमुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतं. यावरूनच आता अजित पवार यांनी कंत्राटदारांना सज्जड दम भरला आहे.
अजित पवार म्हणाले, ‘त्यामुळे कंत्राटदारांनी इथल्या नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल आणि त्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हे काम वेळेत पूर्ण करावं. नितीन गडकरी देखील त्यांच्या भाषणात नेहमी या गोष्टींचा उल्लेख करतात. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदार आणि महानगर पालिकेनं सातत्यानं लक्ष द्यावं. यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून मी केव्हाही तयार असेन,’ असा शब्द देखील अजित पवार यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’
- ‘…मग हे कसले घंट्याचे बेस्ट CM ?’ निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर विखारी टीका
- मोदी सरकारचा निषेध करणार का? सावंतांचा फडणवीसांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
