Share

मोदी सरकारचा निषेध करणार का? सावंतांचा फडणवीसांना सवाल

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्रांचा प्रहार करत रोखठोक सवाल केला आहे.

यासंदर्भात सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विर मध्ये लिहिले आहे की,’ सोयाबीन चे भाव सातत्याने पडत आहेत याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने १२ लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिक सारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे’.

तसेच त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विट फडणवीसांना सवाल केला आहे की,’ एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्याची कणव आहे, असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?’

दरम्यान, केंद्र सरकार हे फक्त ३० ऑक्टो. पर्यंतचपरदेशातून सोयाबीन ढेपेची आयात करणार होते. परंतु देशात सोयाबीनचा तुटवडा जाणवत असून अजून खरिपाचे पीक आलेले नाही. त्यामुळे टंचाई वाढू नये यासाठी येणाऱ्या ३१ डिसें. पर्यंत सोयाबीन ढेपेची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!