Share

पैठण रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध महिला ठार

Published On: 

औरंंगाबाद : भरधाव जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत जवळपास ६५ वर्ष वय असलेल्या वृध्द महिलेचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पैठण रोडवरील गेवराई येथील अलाना कंपनीसमोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मयत वृध्द महिला गेवराई रस्त्याने पायी जात होती. अलाना कंपनीजवळ तिला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृध्द महिलेला परिसरातील नागरीकांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले.

उपचारादरम्यान गुरुवारी रात्री साडेबारा वाजता तिचा मृत्यू झाला. मयत वृध्द महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाची नऊवारी साडी असून अंगात भुरकट रंगाची चोळी आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार लुटे व एस. के. राठोड हे तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!